Tuesday, July 24, 2012

निरोप घेताना


 सातासमुद्रापल्याड बाळा गेलास तू दूर 
आठवणीने तुझ्या रे जिवा लागे हुरहूर 
आणलेस आम्हा येथ ,अमेरिका पाह्ण्यास 
माझ्या रे तू श्रावणबाळा ,किती  जपले आम्हास 
अमेरिका देश सारा आहे,भव्य नि प्रचंड 
दाखविण्या सारे आम्हा कष्टलास तू उदंड 
आमुच्या त्या काळी होते जग फार मर्यादित 
तुझ्या दृष्टीने पाहता ,किती झाले विस्तारित 
श्रमलात तुम्ही दोघे केले आमचे कौतुक 
अशी सुना मुले ही मिळता,झाले आमुचे सार्थक 
पाहता हे सारे काही फिटे डोळ्यांचे पारणे 
पंखभरारी तुमची ही,मिळे आम्हाला पाहणे 
केले ज्ञानार्जन तुम्ही,मिळो यश आणि कीर्ती 
देवो ईश्वर तुम्हाला, सदा सुख आणि शांती 
-आई बाबा 



3 comments:

  1. काकू एकदम मस्त झालीये कविता.. भावना एकदम मस्त मांडल्या आहेत. आता बोनस दिवसांवरती पण एक लिहून टाका आणि आशा आहे की पुण्याला पोचल्यावर सुद्धा अजून कविता लिहित रहाल.

    ReplyDelete
  2. खूपच मस्त कविता आहे. काका-काकू.... तुमची खूप आठवन येइल.

    ReplyDelete
  3. खूप मस्त झाली कविता, खूप भावोत्कट आहे!- शशांक

    ReplyDelete